युतीसाठी राज ठाकरेंकडून उद्धव यांना 7 वेळा फोन: बाळा नांदगावकर
मुंबई, दि. 31 - ‘शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तब्बल 7 वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केले. मात्र दरवेळेस फोनवर उद्धव ठाकरे नाहीत असं सांगितलं गेलं. इतकंच नाही तर आपण ज्यावेळी मातोश्रीवर युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो, तेव्हाही उद्धव ठाकरेंशी भेट होऊ शकली नाही.’ असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.
मनसेकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मनसेनं तातडीनं पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांना उत्तर दिलं आहे. ‘मातोश्री’वर जाऊन मी स्वतः शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना युतीचा प्रस्ताव दिला. पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असा प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलं. मग मी मातोश्रीवर गेल्याचं खोटं बोललो का?’, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.