मूळ पुस्तके झेरॉक्स करून विकणार्या दुकानांवर पोलिसांचे छापे; अटकेची कारवाई
पुणे, दि. 19 - पुण्यातील प्रकाशन संस्थांची शैक्षणिक अभ्यासक्रमांची मूळ पुस्तके झेरॉक्स करून विकणार्या सिंहगड रोडवरील राजमुद्रा झेरॉक्स व महराष्ट्र झेरॉक्स तसेच आकुर्डी येथील कॉपीलाईन व जीनल या झेरॉक्स दुकानांवर पोलिसांनी कॉपीराईट कायद्याअंतर्गत छापे टाकून दोघांना अटक करण्याची कारवाई केली आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ ऑथर्स, पब्लिशर्स अॅण्ड डिस्ट्रिब्युटर्सचे अध्यक्ष सचिन शहा यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी असोसिएशन ऑफ ऑथर्स, पब्लिशर्स अॅण्ड डिस्ट्रिब्युटर्सचे सचिव दिनेश फुरिया आणि खजिनदार रवींद्र वाणी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन शहा म्हणाले की, मूळ पुस्तकांची बेकायदेशीररित्या झेरॉक्स करून विक्री केल्यामुळे लेखक, प्रकाशक, आणि विक्रेते यांच्या ह्क्कावर घाला घातला जात असल्यामुळे पुस्तक विक्री क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दिनांक 6 जानेवारी 2017 रोजी सिंहगड रोड येथील इंजिनिअरिंग कॉलेज परिसरातील महाराष्ट्र स्टेशनरी अॅण्ड झेरॉक्स व राजमुद्रा एन्टरप्रायजेस सेल्स अॅण्ड सव्हिस या दुकानांमध्ये टेकमॅक्स टेक्नीकल आणि निराली या पब्लिकेशन्सच्या मूळ पुस्तकांची झेरॉक्स प्रत काढून स्पायरल बाईडिंग करून त्याचा साठा करून विद्यार्थांना अत्यल्प किमतीत त्याची विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळली होती.
त्याविरोधात आम्ही सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांनी सदर तक्रारीची त्वरित दखल घेऊन कॉपीराईट कायदा कलम 63 व 65 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली.
यावेळी या दुकानातील बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये झेरॉक्स मशीन, सीपीयू, पेन ड्राईव्ह आणि पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती आदींचा समावेश आहे. दुकानाचे मालक भरत राजभाई सांढा व विशाल शिवाजी दिवेकर यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यावेळी बोलताना सचिव दिनेश फुरिया म्हणाले की, अशाच पद्धतीने 12 जानेवारी आणि 17 जानेवारी रोजी आकुर्डी येथील इंजिनिअरिंग कॉलेज परिसरातील कॉपीलाईन व जीनल झेरॉक्स या दुकानांमध्ये टेकमॅक्स, टेक्निकल व निराली या पब्लिकेशन्सची मूळ पुस्तके झेरॉक्स मशीनस्वर स्कॅन करून त्याची झेरॉक्स प्रत काढून स्पायरल बाईंडिंग करून त्याची विद्यार्थांना अल्प किमतीत विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. टेकमॅक्स पब्लिकेशन्सचे सचिन शहा व टेक्निकल पब्लिकेशन्सचे रवींद्र वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांनी सदर तक्रारीची त्वरीत दखल घेऊन कॉपीराईट कायदा कलम 63 व 65 अंतर्गत कायदेशी कारवाई केली.
त्यावेळी दुकानातील बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये झेरॉक्स मशीन, सीपीयू, पेन ड्राईव्ह आणि पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती आदी साहित्यांचा समावेश आहे.
दुकानाचे मालक राकेश रामभाऊ दरवडे आणि अभय वसंत गुजर यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. दुसर्या दिवशी त्यांना न्यायालयीन आदेशानुसार पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.