Breaking News

स्वयमरोजगारसाठी अनुसुचित जाती जमातीच्या लोकांना शासन करणार अर्थ सहाय्य

पुणे, दि. 19 - महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे अनुसुचित जाती व नवबौध्द,महार, खाटीक, बुरुड, वाल्माकी, मेहतर लोकांना स्वयंमरोजगारासाठी  अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची विशेष घटक अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहे. 100 टक्के उद्दीष्ट  साध्य करण्याकरिता व संबधित घटकांना लाभ देण्याच्या हेतुने जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत जास्ती जास्त लोकांनी लाभ  घेण्या करिता अहवान करण्यात येत आहे.
अनुदान योजनेची वैशिटये पुढीलप्रमाणे आहे. प्रकल्प मर्यादा रु.50 हजार. प्रकल्प मर्यादच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रु. दहा हजार पर्यत अनुदान देण्यात  येते व राहिलेली रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परत फेड सर्वसाधारणपणे तीन वर्षात  करावयाची आहे.
बीज भांडवल योजनेंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणार्‍या भाग भांडवलामधुन बीज भांडवल योजना राबविण्यात येते. यामध्ये प्रकल्प मर्यादा 50 हजार  रुपये ते 5 लाखांपर्यंत आहे. प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये  महामंडळाच्या दहा हजार रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे. बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येते.  महामंडळाचे व  बँकेच्या कर्जाची  परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार तीन ते चार वर्षांच्या आत करावी लागते. तसेच अर्जदारास  पाच टक्के स्वत: चा सहभाग भरवयाचा आहे.
सदर योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी महामंडळाची वेबसाईड ुुु.ार्हिीश्रशललवल.लेा ला भेट द्यावी किंवा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, 411,  मंगळवार पेठ, परतानी शो रुम समोर, पुणे-11 येथे संपर्क साधावा असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित पुणे येथील जिल्हा  व्यवस्थापकांनी केले आहे.