फरार असलेला सराईत गुंड अमित शिर्केसह तिघांना अटक
पुणे, दि. 19 - दरोड्याच्या गुन्ह्यात सात महिन्यापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अमित शिर्केसह त्याच्या दोन साथीदारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई 17 जानेवारी रोजी दत्तनगर चौकात करण्यात आली.
अमित राजेंद्र शिर्के (वय-28, रा. मातोश्री बंगला, रविराज सोसायटी, दत्तनगर, आंबेगाव, पुणे), सोन्या उर्फ श्रीकांत सतिष थोपटे (वय-24, रा. रानवडे पाटील हाईट्स,, न-हे रोड, रानवडे गोठा,ता.हवेली, जि. पुणे) आणि दीपक दिलीप नवगणे (वय-30, रा. सहारा निवास, कामठेमळा, फुरसुंगी), असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
आरोपींनी 1 जून 2016 रोजी कात्रज येथील मंगेश जावळकर आणि त्यांच्या मित्रांवर कात्रज सातारा रोडवरील हॉटेल सृष्टीजवळ अचानक हल्ला चढवत त्यांच्या गळ्यातील 75 हजार किमतीची सोन्याची साखळी चोरून नेली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरार होते.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील हवालदार प्रदीप गुरव यांना आरोपी अमित शिर्के हा आपल्या दोन साथीदारांसह दत्तनगर चौकात थांबला असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी धाव घेत तिघांनाही जेरबंद केले. अमित शिर्के हा सराईत गुंड असून त्याच्यावर खून, मारामारी, आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत.