शेतीकडे संधी म्हणून पहा ः निरीजा आदिदाम
अहमदनगर, दि. 22 - शेती हा एक मोठा उद्योग आहे. बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. पारंपरिक शेती सोडून तरुण शेतकर्यांनी तंत्रशुद्ध शेती केल्यास बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. शेती व्यवसायात काम करण्याची खूप मोठी संधी आहे. तरुण पिढीने शेतीकडे एक संधी म्हणून पहावे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील केंद्रीय कृषी सहकार मंत्रालयाचे सहसचिव निरीजा आदिदाम यांनी केले.
राष्ट्रीय कृषी विकास योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पिंपरी गवळी येथे घेतलेल्या कांदा चाळीची केंद्रीय कृषी सहकार मंत्रालयाचे सहसचिव निरीजा आदिदाम यांनी पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कृषीसंचालक प्रल्हाद पोकळे (पुणे), उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, ता.कृ.अ. रामदास दरेकर, अमृत गांगर्डे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
आदिदाम पुढे म्हणाल्या की, तरुण शेतकर्यांनी कृषी प्रक्रियेकडे वळावे. कांदा प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण आत्मासत करून त्या माध्यमातून मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. कांद्याला हमी भाव मिळाला नाही, तरी निराश न होता कांद्यावर प्रक्रिया करून त्यामार्फत मोठा फायदा तुम्ही मिळवू शकता, असे त्या म्हणाल्या.
सुधाकर बोराळे म्हणाले की, कृषी उद्योगाला चालना मिळण्यासाठी विविध स्तरावर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. शेतकर्यांना तंत्रशुद्ध शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. पिंपरी गवळी (ता. पारनेर) या गावात राष्ट्रीय कृष.ी विकास योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत लाभाथ्यांना शेडनेट हाऊस, शेतकर्यांना कांदा चाळी अनुदान तत्त्वावर देण्यात आल्या आहेत, असे सांगितले. यावेळी आदिदाम यांनी शेडनेट हाऊस, पॉली हाऊसची पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.