सत्कार डेअरीने ग्राहकांना चांगली सेवा द्यावी
अहमदनगर, दि. 22 - इम्पिरिअल चौक हा वर्दळीचा परिसर आहे. या परिसरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सत्कार डेअरी सुरू करण्यात आली असून, नागरिकांची या डेअरीमुळे सोय होणार आहे. ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देऊन सत्कार डेअरीने नावलौकिक मिळवावा, असे प्रतिपादन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.
इम्पिरिअल चौक, बुरुडगाव रोड येथील सत्कार डेअरीचे उद्घाटन श्री. कळमकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शफी जहागिरदार, हाजी सय्यद मुख्तार, सय्यद मारुफ, शेख अकलाक, सय्यद मोईन, सय्यद साजीद, सय्यद मोईज, सय्यद आरिफ आदी उपस्थित होते.
कळमकर पुढे म्हणाले की, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे. व्यवसायामध्ये अनेक संधी उपलब्ध असून, त्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
डेअरीचे संचालक सय्यद म्हणाले की, सत्कार डेअरीच्या माध्यमातून दुधाबरोबरच दुधाचे विविध पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहोत. येथे दूध, मलई दही, गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तसेच ड्रायफ्रूट व हॉटेलसाठी लागणारे सर्व पदार्थ योग्य दरात उपलब्ध करून देणार आहोत. ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
उद्घाटन समारंभास विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सय्यद असद यांनी केले, तर आभार सय्यद मोईज यांनी मानले.