Breaking News

इतिहास अभ्यासकांनी विदेशी साधनांचा वापर करावा

। डॉ.वि.ल. धारुरकर यांचे आवाहन 

अहमदनगर, दि. 22 - वर्तमान इतिहासाचे प्रवाह प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाने बदलून टाकले जातात . इतिहासाच्या अभ्यास करताना विदेशी साधनाचा सुध्दा  अभ्यासकांनी वापर करावा देशात इतिहास विषय शिकविला जातो मात्र इतिहास लेखन शास्त्र शिकविले जात नाही . महाराष्ट्र इतिहास परिषदेने अशी उणीव भरून  काढावी असे अवाहन जेष्ठ विचारवंत डॉ.वी. ल. धारूरकर यांनी केले.
अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे  रौप्यमहोत्सवी राष्ट्रीय अधिवेशन येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजीत करण्यात आले त्यावेळी समारोप सोहळ्यात  डॉ.धारूरकर बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंग पवार ( कोल्हापुर ) तर प्रमुख पाहुणे म्हणुन इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सदाशिव  शिवदे, डेक्कन कॉलेजचे विभागीय संचालक डॉ. अरूणचंद्र पवार, बाबासाहेब देशमुख , अ‍ॅड. सुरेश आव्हाड, प्रशांत देशमुख, प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे,  अदिव्यासपीठावर उपस्थित होते ऐतीहासीक वस्तु प्रदर्शन , शस्त्र प्रदर्शन व पुस्तक प्रर्दशनाला सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह पालक व रसिकांनी भेट  दिली. राज्याच्या विविध भागातुन आलेल्या प्रतिनिधीनी निबंध वाचन करून विविध विषयावर सदस्यांशी चर्चा केली. दुपारच्या सत्रात संघटनेची बैठक संपन्न झाली  धारूरकर म्हणाले सातवाहन कालापासुन इतिहास बारकाईने अभ्यासला तर भारतीय इतिहासाचे अनेक पैलु उलगडले जाणार आहेत . छत्रपती शिवाजी  महाराजांच्या कार्यातुन प्रेरणा घेउन अनेक क्रांत्या व क्रांतीकारकांनी इतिहास घडविला इतिहासाच्या माध्यमातुन अर्थकारण, समाजकारण , दैनंदिन जीवनशैली,  ज्ञानमार्गाची पध्दती अशा मुद्दयांचे संशोधन  परिणाम कारक होण्यासाठी इतिहास परिषदेने पुढाकार घ्यावा इतिहास दुर्लक्षुन भविष्य घडविता येणार नाही.  इतिहासाच्या विशुद्ध माहितीतुन नवीन प्रगतीच्या वाटा तयार करणे शक्य आहे. वर्तमान इतिहासाचे अभ्यासाने बदलुन टाकले जातात . जगाला भारताकडूनच  प्राचीनता व बौध्दिकता अभ्यासावी लागणार आहे. राष्ट्रकुट व शिलाहार राजवटीचा अभ्यास सुध्दा अधिक मार्गदर्शक ठरणार आहे राज्याच्या दृष्टीने यादव घराणे  अधिक संपन्न म्हणुन इतिहासात उल्लेख असुन चांदवड व सिन्नर ही गावे यादवांच्या उपराजधानीची होती मध्ययुगीन इतिहासातुन मराठयांच्या इतिहासाची  प्रेरणादायी पाने शोधून पुर्णअभ्यासासाठी पुढे यावे . हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याचे सामर्थ्य राज्याच्या इतिहासात आहे . रुक्षतेने कथा सांगणारा इतिहासकाराऐवजी  इतिहास सांगणारा रसिक कवि असला पाहिजे मध्ययुगीन भारताने महान युग पुरूष म्हणुन शिवाजी महाराजांचे नाव घ्यावे लागेल . या महामानवाचे स्मरण सुध्दा  प्रेरणादायी ठरते . सर्व इतिहास अंधाराने भरलेला असलेला पाहण्यापेक्षा आकाशातील तारकांच्या समुहाचा इतिहास अभ्यासुन प्रकाशाचा सुद्धा इतिहास लिहा. तो  सुद्धा दिशादर्शक ठरवु शकतो इतिहासापासुन धडे घेउन राष्ट्राला सुध्दा पुर्न निर्माण करावे लागणार आहे त्यासाठी येत्या दहा वर्षात परिषदेने ताकद वाढवावी  प्रख्यात जागतीक प्रवासी हो ची मीन्ह याला सुध्दा प्रेरणा देणारा महाराष्ट्राचा धर्म ठरला आहे . गुरुचरित्रापासुन दासबोधपर्यंत शक्तीला जागवणारा महाराष्ट्र धर्म  जागावायचा आहे इतिहास संशोधनाला पारदर्शकता व जिवंतपणा देण्याचे काम परिषदेने हाती घ्यावे यावेळी विविध प्रतिनिधीनी मनोगत व्यक्त करून उत्कृष्ट  आयोजनाबद्दल संयोजकाचे कौतुक केले.