तडीपारीचे प्रस्ताव बनवण्यास सुरुवात
कराड, दि. 22 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कराड उपविभागातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांनी उपाययोजना राबविण्यात सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून कराड तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तसेच निवडणूक कालावधीतील गुन्ह्यात समावेश असलेल्या संशयितांच्या तडीपारीचे प्रस्ताव बनवण्यास सुरुवात झाली आहे.
नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणूका झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे निवडणूका शांततेत व सुरळीत होण्यासाठी संबंधित शासकीय विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बैठका सुरू असून निवडणूकीच्या अनुषंगाने करावयाच्या कामाबाबत सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना वरिष्ठ पातळीवरून सुचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीतील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी संबंधित विभागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तसेच निवडणूक कालावधीत विविध प्रकारचे गुन्हे नोंद असलेल्या संशयितांना तडीपार केले जाते. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांकडून संशयितांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत असतात. कराड पोलीस उपविभागात कराड शहर, कराड ग्रामीण, उंब्रज, तळबीड पोलीस ठाण्यात प्रस्ताव तयार करण्यास सुरूवात झाली आहे.