Breaking News

भेसळयुक्त दूधनिर्मितीवर बागणीत छापा

सांगली, दि. 22 - येथील चंद्रकांत शेटे यांच्या योगेश दूध संकलन केंद्र व घरात अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकत कृत्रीम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात  येणार्‍या 10 लाख 44 हजार 402 रुपयांचा साठा जप्त केला. अन्न सुरक्षा कायद्यार्तंगत शेटे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त शि. बा. कोडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.अ. पवार, रो.रा. शहा व नमुना सहाय्यक कवळे  यांच्या पथकाने शुकङ्घवारी दुपारी ही कारवाई केली.
बागणी येथे शेटे यांचे योगेश दूध संकलन केंद्र आहे. येथून दूधात भेसळ होत असल्याची माहीती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहीतीच्या आधारे  विभागाचे सहाय्यक आयुक्त कोडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सकाळी शेटे यांच्या दूध संकलन केंद्रावर छापा टाकला. यावेळी गाय, म्हैस तसेच कृत्रीम दूध  तयार करण्यासाठी लागणार्‍या पांढर्‍या द्रावणाचा एक कॅन त्यांना आढळून आला. पथकाला संशय आल्याने त्यांनी शेटे यांच्या बागणी येथीलच किङ्घा भाग मध्ये  असणार्‍या घरावर छापा टाकला. यावेळी तिथे भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पदार्थांचा मोठा साठा त्यांच्या निदर्शनास आला. गाय, म्हैस दूध, रिफाईंड  पाम कर्नेल तेल, स्किमड मिल्क पावडर व पांढरे द्रावण यांचे नमुने ताब्यात घेण्यात आले. यामध्ये 47 हजार अठ्ठावीस रुपयांचे गाय व म्हैसीचे दूध, 13 हजार  680 रुपयांचे 31 लिटर उपमिश्रीक पांढरे द्रावण, 9 लाख 78 हजार 840 रुपयांची स्किमड मिल्क पावडर, 4 हजार 854 रुपयांचे रिफांईड पाम कर्नेल तेल असा  10 लाख 44 हजार 402 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सखोल तपास करण्यात येत असून शेटे यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यार्तंगत कारवाई  करण्यात आली आहे.