पंतप्रधान मोदी बनले जगातील सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते
नवी दिल्ली, दि. 20 - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते बनले आहेत. बराक ओबामा यांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ आजपासून संपला आहे. त्यामुळे ट्विटरवर सर्वाधिक चाहते संख्या असलेल्या राजकीय नेत्याची जागा आता पंतप्रधान मोदी यांनी घेतली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा आजपासून डोनाल्ड ट्रम्प स्वीकारणार आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा पंतप्रधानांचे ट्विटरवर सर्वाधिक चाहते आहेत.
ट्रम्प यांना ट्विटरवर 2 कोटी 4 लाख चाहते आहेत. ओबामांचे ट्विटरवर 8 कोटी 7 लाख 17 हजार चाहते आहेत. तर पंतप्रधान मोदींच्या ट्विटर चाहते संख्या 2 कोटी 64 लाख 78 हजार आहे. दुसरीकडे ओबामांच्या फेसबूक पेजच्या लाईक्सची संख्या 5 कोटी 28 लाख आहे. तर मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स 3 कोटी 92 लाख आहेत. याशिवाय मोदींचे गुगल प्लसवर 30 लाख, लिंक्ड इनवर 19 लाख, इन्स्टाग्रामवर 50 लाख आणि यूट्यूबवर 5.91 लाख चाहते आहेत.