Breaking News

दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयचा अहवाल न्यायालयात सादर

मुंबई, दि. 20 - समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. परवानगीशिवाय या अहवालातील गोष्टी जाहीर करू नयेत, असे उच्च न्यायालयाने यावेळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला सांगितले. यावेळी स्कॉटलंड यार्डकडून न्यायवैद्यक अहवाल मिळू शकणार नाही, अशी भूमिका अन्वेषण विभागाने मांडल्यानंतर उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाकडून तपासासाठी आणखी  दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे.