महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाईपलाईन रोड परिसरात स्वच्छता मोहीम
या स्वच्छता मोहिमेत माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, प्रदीप परदेशी, बबनसिंग पाटील, अर्जुनसिंग परदेशी, आनंदसिंग परदेशी, आकाश परदेशी, शंकर परदेशी, छाया राजपूत, रेणुका परदेशी, विजयसिंग परदेशी, दीपक परदेशी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रसिंह परदेशी आदी सहभागी झाले होते.
बाळासाहेब पवार म्हणाले की, स्वच्छतेचे महत्त्व आता समाजातील प्रत्येकालाच ज्ञात झाले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकजण कृती करू लागला आहे. प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती केल्यास आरोग्याचे निर्माण झालेले प्रश्न दूर होण्यास मदत होईल. भारत सरकार देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवित येत असून, यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढल्यास खर्या अर्थाने हे अभियान यशस्वी होईल, असे ते म्हणाले. छायाताई राजपूत म्हणाल्या की, महाराणा प्रताप यांच्या 421व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच यानिमित्त सामाजिक संदेश देत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. या स्व्छता मोहिमेत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लहान मुलांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. वीर महाराणा प्रताप यांचा इतिहास प्रत्येकास माहिती आहे. त्यांच्या विचार अनुसरून जीवनात वाटचाल केल्यास तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल, असे त्या म्हणाल्या.
