Breaking News

क्लिक द किक छायाचित्र स्पर्धेत वृत्तछायाचित्रकार साजिद शेख द्वितीय

। सिनेकलाकार महेश मांजरेकर यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान

अहमदनगर, दि. 31 - शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन व शिवाजीयन्स स्पोर्टस क्लबतर्फे घेण्यात आलेल्या आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेच्या क्लिक द  किक या छायाचित्र स्पर्धेत वृत्तछायाचित्रकार साजिद शेख यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. साजिद शेख यांना प्रसिध्द सिनेकलाकार महेश मांजरेकर यांच्या हस्ते  पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आशाताई फिरोदिया, छायाताई फिरोदिया, वृत्त छायाचित्रकार जितेंद्र  अग्रवाल आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
 अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर रंगलेल्या आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यांचे क्षण छायाचित्रकारांनी टिपले होते. या स्पर्धेत अनेक  छायाचित्रकार सहभागी झाले. सहभागी छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन सावेडी येथील माऊली सभागृहात भरविण्यात आले होते. या स्पर्धेचे  पारितोषिक वितरण माऊली सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेख यांनी पारितोषिक मिळवल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.