आढळगाव जि.प.गटात लहानग्या मुलींनी
साठवलेले पैशातुन आईची डिपॉझिट रक्कम भरली
अहमदनगर, दि. 31 - राजकारणी मंडळींसाठी आवडीचे क्षेत्र अर्थात जिल्हा परिषद,पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकांचे सर्वत्र बिगुल वाजले असतानाच दुसरीकडे लहानग्या मुलीही स्वत:च्या खाऊच्या पैशातुन साठवलेल्या गल्ल्यामधील म्हणजेच पिगी बँकेतील रक्कम आपली आई उमेदवारी करत आहे हे पाहुन लहानग्या मुलींनी उमेदवारीसाठी आवश्यक लागणारी 1000 रुपये अनामत रक्कम भरुन लहान मुलीही मागे नाहीत,याची समाजाला जाणीव करुन देत वंशाला दिवा म्हणुन मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या विचारांना मुलींनीच पुढाकार घेत आपल्या आईचे डिपॉझिट भरुन मुलीही वंशाची पणती..कशी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव जि.प.गटात निवडणुकांच्या निमित्ताने समोर आल्याने भावी पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,श्रीगोंदा तालुक्यातील किल्ले धर्मवीरगडासाठी प्रसिद्ध असलेले ऐतिहासिक,पेडगावचे सामाजिक कार्यकर्ते,गडदुर्ग संवर्धक,शंभुभक्त लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के यांच्या पत्नी सौ.योगिता लक्ष्मीकांत शिर्के यांनी आढळगाव जिल्हा परिषद गटातुन (सर्वसाधारण महिला)या राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज दि.30 रोजी दाखल केला असुन,या शिर्के दांपंत्यास कु.सईराजे व कु.जुईराजे या दोन मुली असुन त्या,पाचवी व पहिली च्या वर्गात शिकत आहेत.या लहानग्या मुलींनी खाऊला दिलेल्या पैशातुन काही पैसे वाचवत मोठी रक्कम साठवून त्यांनी ती रक्कम आपल्या आईच्या उमेदवारीसाठी लागणारे डिपॉझिट(अनामत रक्कम)दहा रुपयांचे 100 नाणी भरुन मुली आपल्या आई- वडिलांना कसा आधार होऊ शकतात व वंशाची पणती होत मोठा आदर्श निर्माण केला आहे.शिर्के परिवाराने या दोन्ही मुली आपल्याला मुलांप्रमाणे वाटत असुन यांना चांगले समाजसेवक,आदर्श राजकारणी होण्यास प्रेरणा देणार असल्याचे आमचे प्रतिनिधी यांना बोलताना सांगीतले..
यावेळी लहानग्या मुलींनी ही अनामत रक्कम आपल्या आईच्या सौ.योगिता लक्ष्मीकांत शिर्के यांच्या हस्ते आढळगाव जि.प.गट (नं.65) चे निवडणुक कर्मचारी व सुरेगावचे तलाठी भाऊसाहेब श्री. शरदचंद्र गोरक्षनाथ नांगरे यांच्याकडे सुपुर्द केल्यानंतर नांगरे यांनी शिर्के यांना अधिक्रुत अनामत पावती दिली.
