अनुभूती,मुंबईच्या ‘ईन सर्च ऑफ’ ला सर्वोत्कृष्ठ एकांकिका पुरस्कार
अहमदनगर, दि. 31 - आतिशय उत्तम नियोजन व नाविण्यतेला वाव देत कलाक्षेत्रातील सर्वांचा विचार करणारी व एकांकिकाच्या माध्यमातून राज्यातील कलाकारांना उत्तम व्यासपीठ देणारी अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा सर्वच कलाकारांसाठी कर्मभूमी असल्याचे मत प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले.
अनुष्का मोशन पिक्चर अॅण्ड एन्टरटेनमेंट प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान आयोजित अ. नगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ एकांकिका सांघिक प्रथम पुरस्कार 7 1,111 रुपये व करंडक अनुभूती ,मुंबईच्या ‘ईन सर्च ऑफ ’ या एकांकीकेस अभिनेते महेश मांजरेकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप ,दिग्दर्शक प्रविण तरडे, लेखक किरण यज्ञोपवित, एबीपी माझाचे अमित भंडारी, अनुष्का मोशनचे नरेंद्र फिरोदिया, श्रीमती आशाताई फिरोदिया,श्रीमती छायाताई फिरोदिया , ललिता फिरोदिया, मेधा मांजरेकर ,विक्रम फिरोदिया,राखी फिरोदिया, नमिता फिरोदिया , महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्शल बोरा, राकेश भंडारी, स्वप्नील मुनोत, पुष्कर तांबोळी आदि उपस्थित होते.
यावेळी मांजरेकर म्हणाले की नाटकांपासून माझ्या करीयरची सुरवात झाली असून अशा एकांकिका मधून चांगले कलाकार निर्माण होतील, या स्पर्धेतील सादर झालेल्या एकांकिकाचे विषय , सादरीकरण याविषयी माहिती घेतली त्यामुळे खरे तर मला पुढील वर्षी स्पर्धा पाहण्यासाठी बोलवा. एकांकिकात सर्वात जास्त लेखनाला महत्व असून चांगले लेखक व कलाकार ही माझीही गरज असून त्यासाठी यातील विजेत्यांना मिफ्ता अवार्ड कार्यक्रमात संधी देईल. परीक्षक प्रविण तरडे, लेखक किरण यज्ञोपवित,अमित भंडारी व परीसंवाद वक्ते निरंजन गोडबोले यांनी मनोगतात स्पर्धांतील बारकाव्यांविषयी माहिती दिली. समाजाचे वास्तवचित्र प्रभावीपणे दर्शविणारे विषय, तंत्रज्ञाणाचा उत्तम वापर, सादरीकरणातील नाविन्यता याविषयी समाधान व्यक्त केले.