Breaking News

शेतकरी हितासाठी शासन तत्पर - गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 14 - शेतकरी हेच माझे दैवत असुन त्यांच्या हितासाठी शासन सदैव तत्त्पर आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव  पाटील यांनी लमांजन येथे केले. त्यांचे हस्ते म्हसावद व लमांजन येथील बंधार्‍यात निर्माण झालेल्या जलाशयाचे जलपुजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. अरुण बडगुजर हे होते.
म्हसावद येथे 2 कोटी खर्च करुन गिरणा नदीवर बंधारा उभारण्यात आला. तसेच लमांजन येथे शेतकर्‍यांनी स्वखर्चाने बंधार्‍याची दुरुस्ती केली. यामुळे या ठिकाणी  मोठ्याप्रमाणावर पाणी साचले असून परिसरातील हजारो शेतकर्‍यांसाठी हे पाणी नवसंजीवनी ठरणार आहे. ना. पाटील यांचे हस्ते विधीवत पुजन करुन बंधार्‍यांचे  जलपुजन करण्यात आले. बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी पुढे आलेल्या शेतकरी व ग्रामस्थांचे ना. गुलाबराव पाटील यांनी कौतुक करुन बंधार्‍याच्या कायम दुरुस्तीसाठी  83 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीस्तव पाठविण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी पाळधी ते पोखरी ग्रामा-5 या रस्त्याचे 25 लाख रुपये खर्चून होत असलेले मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भुमीपूजन तसेच पाळधी बु व पाळधी खु  येथे 25 लाख रुपये खर्चून चे पेव्हरब्लॉक बसविणेच्या कामाचा शुभारंभही ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रसंगी सा.बां.चे उपअभियंता ए.जे.  पाटील, शाखा अभियंता आर.बी. कदम, तहसिलदार अमोल निकम, स्थापत्य अभियंता ई.आर.चौधरी, शाखा अभियंता बी.ए. चौधरी, पप्पु सोनवणे, नाना  सोनवणे, राजेंद्र चव्हाण, पी.पी.पाटील धोंडु जगताप, सरपंच संजय देशमुख व शरद कासट, सोपान पाटील, विजय आमले, नारायण चव्हाण, ग्रा.प. सदस्य सुरेश  चिंचोले, दिनेश बडगुजर, विशाल चव्हाण, दिनकर माळी, श्रीकृष्ण साळुंके, नवल पाटील यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  गणेश आमले तर आभार केशव पाटील यांनी मानले.