Breaking News

जि. प. पं. स. उमेदवारांची निवड करण्यासाठी राष्ट्रवादीचे निवड मंडळ जाहीर

नाशिक, दि. 27 - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निवड मंडळ  प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांच्या सुचनेनुसार व मान्यतेनुसार  जिल्हाध्यक्ष व निवड मंडळाचे निमंत्रक अ‍ॅड. रविंद्र पगार यांनी जाहीर केले आहे. या निवड  मंडळाची रचना व मान्यवर खालीलप्रमाणे आहेत.
जिल्हा प्रभारी आ. जितेंद्र आव्हाड, निवड मंडळाचे अध्यक्ष श्रीराम शेटे तर निमंत्रक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार हे आहेत. या निवड मंडळात आ. हेमंतराव  टकले, आ. जयवंत जाधव, आ. पंकज भुजबळ, आ. नरहरी झिरवाळ, आ. दिपिका चव्हाण, माजी मंत्री ए.टी. पवार, तुकाराम दिघोळे, माजी आमदार दिलीप  बनकर, संजय चव्हाण, उत्तम भालेराव, शांताराम आहेर, लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या उमदेवार डॉ. भारती पवार, विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे  उमदेवार अ‍ॅड. भगीरथ शिंदे, नितीन मोहिते, हिरामण खोसकर, प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे, नाना महाले, विश्‍वास ठाकूर, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे  यांच्यासह सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, पक्षाचे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, तालुकावार त्या- त्या विधानसभा मतदार संघाचे पक्षाचे अध्यक्ष, तालुका प्रभारी,  तालुका निरीक्षक तसेच तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष हे सदस्य असतील.
तालुका प्रभारी व तालुका निरीक्षक यांनी त्यांना नियुक्त केलेल्या कार्यक्षेत्रात जाऊन तालुका निवड मंडळाची बैठक घेऊन गटवार कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली  आहे. तसेच समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत तालुका स्तरावर चर्चा केली आहे. या निवडणुकांमध्ये प्रामाणिक, शेतकरी व सर्वसामान्य जनतेशी नाळ  असलेले उमेदवार देण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा भर आहे.