Breaking News

घरकुलांवरील विद्युत तारा हटविण्याची मागणी

बुलडाणा, दि. 18 - चिखली शहरातील पंचायत समितीचे मागील बाजुस असलेल्या सुभाष नगर मधील रमाई आवास योजना तसेच झोपडपट्टी विकास  कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांवरुन विद्युत तारा गेलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या नागरीकांचे प्राण धोक्यात आलेले आहेत. त्यामुळे  घरकुलांवरील विद्युत तारा हटविण्यासाठी दि. 16 जानेवारी 2017 रोजी चिखली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष बबनराव देव्हडे यांचे नेतृत्वात  चिखली नगर पालीकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, वास्तविक सदर मंजूर झालेल्या घरकुलांवरील विद्युत तारा बांधकाम करण्याआधी हटविणे गरजेचे असतांना तसे न  करता घरकुलांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या परीसरातील नागरीक हे आर्थीक  दृष्ट्या अतिशय मागासलेले असुन सदर तारा हटविणेसाठी विद्युत वितरण  कंपनीला भराव्या लागणार्‍या पैशांची व्यवस्था त्यांचेकडून होवू शकत नाही. त्यामुळे सदर जबाबदारी नगर पालिकेने स्विकारुन या परिसरातील घरांवरुन गेलेल्या  तारा हटविण्यासाठी लागणारे पैसे विद्युत मंडळास भरुन जिवीत हानी होण्यापासुन तसेच अशा दुर्घटनांमधून नागरीकांचे प्राण वाचावे हया दृष्टीने कार्य करावे.
      नुकतेच काही दिवसांपूर्वी याच परीसरातील एका युवकास घराचे छतावर गेला असता उच्च दाबाच्या ताराचा स्पर्श होवून तिव्र विजेचा झटका लागण्याची घटना  घडली आहे सुदैवाने सदर युवकास तातडीने औरंगाबाद येथे इस्पीतळात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
यावेळी प्रधान मंत्री आवास योजनेचे (घरकुलचे अधिकारी) श्री. तडस साहेब, तसेच नगर परिषदेच्या उपाध्यक्षा वजीराबी शे. अनिस, तसेच भाजपाचे  अनिसभाई हे देखील उपस्थीत होते. त्यांच्या उपस्थीतीत मुख्याधिकारी यांनी पंधरा दिवसात सदर समस्या निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले.
निवेदन देते वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष देव्हडे यांचेसह दिपक आंभोरे, वसीमभाई, सलमानभाई, पापाराम निकाळजे, सलिम शहा,  हमीद शहा, सुभान शहा, सिराज शहा, शेख आरीफ , शे. फैजान, शे. एजाज, शे.अनिस, शिवाजी शिराळे, शे. मोसिन, आसीफ शहा, सोहम साळवे, अकिब  शहा, शे. शहेजाद, शरीफभाई बागवान, शे. समिर, सुरेश भटूरकर, शे. सलीम, शे, अलीम, शे. कलीम यांचेसह सुभाष नगरातील अनेक कार्यकर्ते व नागरीक हजर  होते.