बुद्धिमत्ता स्पर्धा परिक्षेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
बुलडाणा, दि. 18 - स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल येथे विद्येची देवी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त भव्य बुध्दिमत्ता स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे बक्षिस वितरणाचे कार्यक्रम आज श्री शिवजी हायस्कूल येथे पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते आणि आदिशक्ति ग्रुपचे संतोष अंभोरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुशिरखान कोटकर, मातृतीर्थ पत्रकार संघाचे अध्यक्ष सुषमाताई राऊत आदिशक्ति ग्रुपचे अतुल शिंदे, कार्यवाहक प्रकाश बस्सी उपस्थित होते. यावेळी मान्यवारांच्या हस्ते प्रथम क्रमांक कैलास शेरे, द्वितीय क्रमांक मनीष घोड़े, तृतीय क्रमांक ओम तिडके, चतुर्थ क्रमांक अभिजीत देशमुख यांना बक्षीस वितरित करण्यात आणि सहभागी एकूण 283 विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल काकड यांनी तर आभार दीपक तिडके यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आदिशक्ति ग्रुप तर्फे करण्यात आहे होते. कार्यक्रमाच्या यशवितेसाठी अतुल शिंदे, प्रकाश बस्सी, संतोष अंभोरे मित्र मंडळ यांनी केले होते यावेळी विद्यार्थी, शिक्षक, आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.
