Breaking News

पथनाट्य, रॅली व निदर्शनाव्दारे रोहित व्येमुलास अभिवादन

बुलडाणा, दि. 18 - हैदराबाद विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित व्येमुला याच्या आत्महत्येस एक वर्ष पुर्ण होत असल्याच्या अनुषंगाने  आज 17 जानेवारी रोजी पथनाट्य, रॅली व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून रोहित व्येमुलास अभिवादन करण्यात आले. रॅलीची सुरवात गांधीभवन  येथे होऊन जयस्तंभ चौक, संगम चौक येथे पथनाट्याचे सादरिकरण करण्यात आले. रॅलीमध्ये रोहित व्येमुलाचा फोटो घेऊन युवावर्ग मोठ्या संख्येने सामील  झाला होता. पथनाट्याचे शेवटचे सादरीकरण व निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. रोहित व्येमुलाच्या आत्महत्येस जबाबदार परिस्थिती,  विषमता, जातीयवाद, वर्णवाद व मनुवादाची मांडणी पथनाट्याव्दारे जनसामान्यांसमोर करण्यात आली. आत्महत्येपुर्वी लिहिलेले पत्र पथनाट्यामध्ये वाचुन  दाखविण्यात आले. ढोल ताशे, पथनाट्य व हातात रोहित व्येमुलाचा फोटो व घोषवाक्यांचे फलक घेवुन निघालेल्या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधुन घेतले होते.  पथनाटयामध्ये अंजली जाधव, विशाल बटुकर, वैभव राऊत, मेघा तायडे, आदींसह रॅली व निदर्शनामध्ये अ‍ॅड.गुणवंत नाटेकर, छोटु कांबळे, विजय गवई, अशोक  काकडे, सतीश पैठणे, देवेंद्र खिल्लारे, लिलाताई तायडे, सतीश यंगड, आकाश सगट, शंकर अवसरमोल, देवानंद वानखेडे, अण्णा डोंगरदिवे यांच्यासह असंख्य  तरूण-तरूणींनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.