सायनाने जिंकले ‘मलेशिया मास्टर्स’चे विजेतेपद
सरावाक, दि. 22 - मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालने स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावण्याची सायनाची ही पहिलीच वेळ आहे. सायनाने थायलंडच्या पोर्नपावे चोचुवाँग हिचा 22-20,22-20 असा पराभव केला. पहिला गेम अतिशय अटीतटीचा झाला पण सायनाने अनुभवाच्या जोरावर तो गेम जिंकला. त्यामुळे दुस-या गेममध्ये सायनाने आक्रमकतेने खेळण्यास सुरूवात केली. चोचुवाँगनेही तिला कडवी झुंज दिली. पण अखेर सायनाने सामना जिंकत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
