Breaking News

दिल्लीतील तापमानाचा पारा घसरल्यामुळे शाळांना 19 जानेवारीपर्यत सुट्टी

नवी दिल्ली, दि. 13 - दिल्लीतील तापमानाचा पारा 2 अंश सेल्सियस पर्यंत घसरल्याने येथील शाळांच्या सुट्टी 19 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.  गुरुवारी नोएडामधील सर्व शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  नवी दिल्ली नगरपरिषद, दिल्ली महापालिका आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांना सुट्टीबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.