Breaking News

नाशकात फायनान्स कंपनीची 59 लाख रुपयांची फसवणूक

नाशिक, दि. 16 - नाशिकमध्ये एक आर्थिक गुन्हा उघडकीस आला असून एका फायनान्स कंपनीच्या विक्री प्रतिनिधी, सेल्स एक्झिक्युटिव्हने  बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीला तब्बल 59 लाख रुपयांना चुना लावला आहे. अविनाश कुलकर्णी या सेल्स एक्झिक्युटिव्हचे नाव असून बजाज  फायनान्सच्या कायदेशीर सल्लागारांनी गंगापूर पोलीस ठाण्यात कुलकर्णी विरोधात दाखल केली आहे.
गेल्या वर्षभरापासून होणारा हा गैरप्रकार बजाज फायनान्सच्या अधिकार्‍यांना काही ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर लक्षात आला. या कुलकर्णी नामक विक्री  अधिकार्‍याने आपल्याच जुन्या 17 ग्राहकांचे जुन्या कागदपत्रांचा वापर करत गंगापूर रोडवरील थत्तेनगर शाखेत बनावट खाती बनवली. त्यावर बनावट कर्ज प्रकरण  तयार केले. या खात्यांच्या माध्यमातून सेल्स एक्झिक्युटिव्हने तब्बल 59 लाख 3 हजारांचा गंडा घातला आहे.
बजाज फायनान्सच्या कायदेशीर सल्लागारांच्या तक्रारीनुसार आरोपी अविनाश कुलकर्णी विरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान आरोपी अविनाश कुलकर्णी फरार झाला आहे.