घानवडात यल्लम्मा मंदिरात चोरी
सांगली, दि. 19 - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवी मंदिराच्या ग्रीलचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी चांदीची सव्वाकिलो वजनाची छत्री, सोन्याचे डोर्ले तसेच सीसीटीव्ही कॅमेर्याचे साहित्य असा सुमारे एक लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना घानवड (ता. खानापूर) येथे घडली.
घानवड येथे विटा ते मायणी रस्त्यालगत श्री यल्लम्मा देवीचे मंदिर आहे. येथील श्रीमती अरुणा गुरव या पूजाअर्चा करतात. श्रीमती गुरव या मंदिराच्या दरवाजांना कुलूप लावून घरी गेल्या. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य लोखंडी ग्रीलची पट्टी तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्याच्या केबल तोडून टाकल्या.
तसेच सीसीटीव्हीची मुख्य हार्डडिस्क काढून घेतली. त्यानंतर मुख्य गाभार्याील ग्रील उचकटून चोरट्यांनी 1 किलो 200 ग्रॅम वजनाची चांदीची 1 किलो 200 ग्रॅम वजनाची चांदीची छत्री, देवीच्या गळ्यातील दीड ग्रॅम वजनाची सोन्याची दोन डोर्ली, पितळी समई सीसीटीव्ही कॅमेर्याची पीएक्सपी कंपनीची डीव्हीआर असा चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे एक लाख रुपये किमंतीचा ऐवज लंपास केला.
सकाळी श्रीमती गुरव या पूजा करण्यासाठी मंदिरात आल्या असता, त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. चोरीचे वृत्त समजताच मंदिराजवळ भाविकांची मोठी गर्दी झाली.
याप्रकरणी यल्लमा देवी मंदिर समितीचे उपाध्यक्ष प्रशांत भोसले यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ चोरीच्याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. परिविक्षाधीन पोलिस उपनिरिक्षक कु. एस. बी. दुरंदे तपास करीत आहेत. या घटनेचे वृत्त समजताच मंदिराजवळ भाविकांची मोठी गर्दी झाली होती.