Breaking News

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस 105 जागा लढवणार

लखनौ, दि. 22 - उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटप निश्‍चित झाले असून काँग्रेस 105 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरित सर्व जागांवर समाजवादी पक्ष निवडणूक लढवणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीपासून सात टप्प्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. 403 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली. मात्र दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाचा पेच कायम होता. अखेर आज दोन्ही पक्षांमधील जागा वाटप निश्‍चित झाले. दरम्यान, समाजवादी पक्ष शंभरपेक्षा जास्त जागा काँग्रेसला देण्यास तयार नव्हता. तर दीडशेपेक्षा जास्त जागांची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. राज्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवायचे असेल, तर दोन्ही पक्षांसाठी युती करणे अनिवार्य असल्याचे काँग्रेस व सपा या दोन्ही पक्षांतील नेत्यांचे मत असल्यामुळे अखेर काँग्रेसने 105 जागांवर समाधान मानले.