Breaking News

जि.प वतीने वक्तृत्व स्पर्धाचे पारितोषीक वितरण

अहमदनगर, दि. 29 - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाविद्यालयीन युवकांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा स्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले.
ग्रामिण भागामध्ये स्वच्छतेचे महत्त्व समजावे व स्वच्छतेच्या विषयामध्ये प्रगती व्हावी यासठी महाविद्यालयीन युवा शक्तीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामध्ये  सहभागी करुन घेण्यासाठी राज्यमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर स्वच्छता मित्र वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यासाठी दि.10 जानेवारी रोजी  जिल्हास्तरावर कनिष्ठ व वरिष्ठ व वरिश्ठ गट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रजासत्ताक दिना निमित्त संपन्न झाला.
या स्पर्धेमध्ये वरिष्ठ गटात ठाकरे किरण बबन (कोपरगांव), प्रथम तर गांगर्डे तुषार सुनिल ( राहता) व ढवळे अतुल बाळासाहेब व्दितीय विभागुन देण्यात आला  आहे. तृतीय शिंदे अशोक चंद्रभान (पारनेर), त्याचप्रमाणे कनिष्ठ गटात कु. झंजाड कांचन (पारनेर) प्रथम आली आहे, तर बडीतके निलेश अण्णासाहेब  (श्रीरामपुर) याने व्दितीय क्रमांक मिळवल असुन तृतीय कु.साळवे प्राप्ती राजेश यांना देण्यात आला आहे.
यातील कनिष्ठ व वरीष्ठ गटातील अनुक्रमे प्रथम कु.झंजाड काचंन संजय व वरीष्ठ गटात ठाकरे किरण बबन कोपरगाव या प्रथम आलेल्या स्पर्धकांची निवड  राज्यपातळी वर होणार्‍या स्पर्धेसाठी झालेली आहे. विजेते स्पर्धकांचे अभिनंदन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, डॉ.अशोक कोल्हे, परीक्षीत जाधव,  प्रशांत शिर्के, उज्वला बावके केले आहे.