मार्कंडेय विद्यालयातील विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी सपंन्न
अहमदनगर, दि. 29 - मार्कंडेय जंयती निमित्त मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठान व बजरंग मार्कंडेय सेवा मंडळाच्या वतीने मार्कंडेय प्राथमिक विद्यालयतील विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पत्रकार आबीद दुलेखान, प्रभारी मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल, सौ.गाजेंगी, सौ.परदेशी, श्रीम. जंगम, सौ.निलिमा बुरम, श्रीम.आतकरे, सरोजिनी व म्याकल पुष्पा उपस्थित होते.
पत्रकार आबीद खान म्हणाले कि, प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या जन्म तारखेबरोबरच रक्तगट कोणता आहे हे माहिती पाहिजे. अनावधानाने जर अपघात झाला आणि त्यावेळी रक्ताची आवश्यक्ता भासली तर आपला रक्तगट कोणता आहे हे तात्काळ सांगता आल्यास आपली गरज लवकरात लवकर पुर्ण होते. त्यामुळे प्रत्यकाला आपले रक्तगट माहिती असणे आवश्यकच आहे. मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने आज जो उपक्रम राबविला आहे तो उपक्रम कौतुकास्पद आहे,असे ते म्हणाले.
या रक्तगट शिबीरात 108 विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी करण्यात आली. रक्तगट तपासणी करण्यासाठी अभिजित मंद्रे, श्रीकांत सिद्दम यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रतिष्ठानेच अध्यक्ष पै.शुभम सुंकी, श्रीकांत नुती, अमोल गुंडू, योगेश न्यालपेल्ली, अक्षय बल्लाळ, अजय लयचेट्टी, विशाल बोल्ली, राहुल म्याना, संजय नुती आदी परिश्रम घेतले.मार्कंडेय जयंती निमित्त बजरंग मार्कंडेय सेवा मंडळ व श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने सोमवार दिनांक 30 जानेवारी 2017 रोजी महाप्रसादाचे व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठाचे अध्यक्ष पै.शुभम सुंकी यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल गुंडू यांनी केले.