लायम सिंग ‘सपा’चे संरक्षक, अखिलेश राष्ट्रीय अध्यक्ष?
लखनौ, दि. 22 - समाजवादी पक्षाच्या लखनौ येथील कार्यालयाबाहेर मुलायम सिंग हे पक्षाचे ‘संरक्षक’ तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची पाटी लावण्यात आली. मुलायम सिंग आणि मुलगा अखिलेश यादव यांच्यात सायकल या पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून वाद होते. त्यावर सायकल हे चिन्ह अखिलेशला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. त्यानंतर पाट्यांवरील हा बदल करण्यात आला आहे.
