Breaking News

भाजपा युवा मोर्चाच्या कराड दक्षिण तालुका सचिव पदी अनिल जाधव

कराड, दि. 19 (प्रतिनिधी) : भाजपाच्या युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांनी पार्टी युवा मोर्चाच्या कराड दक्षिण तालुका सचिवपदी अनिल सर्जेराव  जाधव (आगाशिवनगर, ता. कराड) यांची निवड केली. 
अनिल जाधव हे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक आहेत. जाधव हे संघटक आहेत त्यांचे अनेक तरुण समर्थक आहेत. त्यांनी  आतापर्यंत अनेक सामाजिक कामे उभी केली आहेत. गेली दहा वर्षे जाधव यांनी भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम केले तसेच अतुल भोसले यांच्या  नेतृत्वाखाली कराड तालुक्यामध्ये भाजपा पक्ष वाढीसाठी व केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करेन असा  विश्‍वास अनिल जाधव यांनी निवड प्रसंगी व्यक्त केला.
जाधव यांची भाजपाच्या कराड दक्षिण सचिवपदी निवड झाल्याबद्दल भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, सरचिटणीस  आबा सुर्यवंशी, पै. अविनाश थोरात, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप क्षीरसागर, मलकापूर नगरपंचायतीचे नगरसेवक हणमंतराव जाधव, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष शंकर  पाटील यांनी अभिनंदन केले.