विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक मिळवा : गायत्रीदेवी
औंध, दि. 19 (प्रतिनिधी) : औंध शिक्षण मंडळाच्या सर्व विद्या शाखांमधील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध क्रीडा स्पर्धां, स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक मिळवावा, त्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घ्यावेत, यासाठी औंध शिक्षण मंडळामार्फत आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही चेअरमन श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.
येथील औंध शिक्षण मंडळाच्या सर्व विद्या शाखांच्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी दहावी, बारावी तसेच विविध क्रीडा स्पर्धा, महाविद्यालयातील गुणवंत व यश संपादन केलेल्या विद्यार्थी व खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री. श्री. विद्यालयाचे उपशिक्षक आर. आर. देसाई यांना संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विश्वस्त शंकरराव खैरमोडे, आब्बास आतार, हणमंतराव शिंदे, पद्मा देशपांडे, दिलीपबुवा जाधव, सचिव प्रदीप कणसे, सहसचिव दीपक कर्पे, प्राचार्य डॉ. संभाजी बामणे, ए. टी. शिंदे, एस. डी. दौंड, व्ही. एस. मोरे, एस. बी. कुंभार, एस. बी. घाडगे उपस्थित होते.
औंध शिक्षण मंडळाला एकशे अठरा वर्षाची शैक्षणिक परंपरा आहे. औंधने अनेक नररत्ने दिली. तोच वारसा जतन करण्यासाठी प्रत्येक विद्या शाखेने कठोर मेहनत घेऊन इतिहास उगाळत न बसता नवीन महान विभुती घडवाव्यात, असे आवाहन हणमंतराव शिंदे यांनी केले.
प्रास्ताविकात सचिव प्रदीप कणसे यांनी पारितोषिक वितरणाची संकल्पना व एकशे एक गुणवत्ता प्राप्त खेळाडू व विद्यार्थ्यांना सुमारे 27 हजार 10 रूपयांची पारितोषिके दिल्याची माहिती दिली. सूत्रसंचालन सी. आर. जाधव यांनी केले. सचिन सुकटे यांनी आभार मानले.