राज्यमंत्र्यांचा नाशिकमध्ये भाजपाला सुचक इशारा
नाशिक, दि. 19 - विश्वासघात करणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे हा शिवसेनेचा पिंड नाही म्हणूनच शिवसैनिकांचे आत्मबळ नेहमीच चैतन्याने बहरलेले असते या शब्दात ना.दादा भुसे यांनी मिञपक्ष भाजपच्या कुटनितीला उत्तर देऊन स्वबळावर निवडणुका जिंकण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे असे स्पष्ट केले.ना.भुसे एका खाजगी कार्यक्रमासाठी द गेट वे या हाटेलमध्ये आले तेंव्हा पञकारांशी अनौपचारीक वार्तालाप करीत होते. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात युती होणार की नाही याविषयी वेगवेगळ्या वावड्या उठत असल्याच्या पार्श्वभुमीवर उपस्थित पञकारांनी ग्रामिण विकास राज्य मंत्री दादा भुसे यांना छेडले,तेव्हा त्यांनी आलात तर सोबत नाहीतर स्वबळावर निवडणुका जिंकण्याचा निर्धार शिवसेनेने केल्याचा सुचक इशारा दिला. युती करायची की नाही याचा सर्वस्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा आहे.त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आदेश आहे.विधानसभा निवडणुकी दरम्यान झालेली चुक यावेळी होणार नाही.शिवसैनिकाच्या आत्मसन्मानाशी तडजोड करून होणारी युती स्वीकारायची नाही.हा निर्णय पक्षप्रमुखांनी घेतला असल्याने झाली तर सन्मानानेच युती होईल,अन्यथा स्वबळावर निवडणूका जिंकण्या इतपत शिवसैनिकांचे आत्मबळ सक्षम आहे.विश्वासघात करून मिञाच्या पाठीत खंजीर खुपसणे ही शिवसेनेची संस्कृती नाही म्हणूनच शिवसैनिकांचा आत्मविश्वास नेहमी चैतन्यमय असतो.गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणूनच आमच्या पक्षप्रमुखांनी मिञपक्षाचे आमदार उमेदवारी मागत असतानाही नाकारून युती धर्म पाळला होता.त्याची परतफेड कशी झाली हे अवघ्या महाराष्ट्राने पाहीले,ती चुक यावेळी होणार नाही असे स्पष्ट करीत दादा भुसे यांनी महाराष्ट्रात युतीचे भविष्य काय असेल , शिवसेनेची व्युहनिती कशी यावर सुचक भाष्य केले.