काश्मीरमधील झालेल्या हिमस्खलनातील मृतांच्या संख्येत वाढ
श्रीनगर, दि. 27 - जम्मू -काश्मीरमधील गुरेझ भागात सुरक्षा दलाच्या छावणीवर झालेल्या हिमस्खलनात 10 जवानांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर, अनेक जण बेपत्ता आहे. हिमस्खलनानंतर बर्फवृष्टी सुरू असूनही या भागात बचाव कार्य सुरू आहे. आज तीन जणांचे मृतहेद ताब्यात घेण्यात आले. तर, काल सात जवानांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या जवानाकडून देण्यात आली.
काल गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात झालेल्या हिमस्खलनात मेजर अमित सागर यांचा मृत्यू झाला होता. तर, चार जवान जखमी झाले होते. जखमींवर उपचार सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून जम्मू -काश्मीरमध्ये सतत हिमस्खलनाच्या घटना घडत आहे.