पाकिस्तानच्या संसदेत सत्ताधारी - विरोधकांमध्ये हाणामारी
इस्लामाबाद, दि. 27 - पाकिस्तानच्या संसदेत गुरुवारी विरोधी पक्ष आणि सत्ताधा-यांमध्ये मारामारी पाहायला मिळाली. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी हे सभागृहाला संबोधित करत होते. त्यावेळी तहरीक-ए-इन्साफच्या सदस्यांकडून पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीगचे शाहिद अब्बासी यांनी कुरेशी यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र घोषणाबाजी सुरूच होती. या घटनेनंतर संसद 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.
