पोलिस मित्र संघटनेच्या वतीने पांजरपोळ येथील गो शाळेस चारा वाटप
अहमदनगर, दि. 29 - पोलिस मित्र संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त पांजरपोळ येथील गो शाळेस जिल्हाप्रमुख धनंजय गाडे यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आला. यावेळी सकल जैन, सार्थक चोपडा, प्रतिक सुराणा, श्रवण फिरोदिया, भावेश चंगेडिया, अमित सुरपुरिया, यश मुथा, अथर्व कुलकर्णी, वर्धमान पितळे, आशितोष राऊत, प्रविण कोळगे, विशाल कोल्हे, शुभम अंगारे, राहुल संचेती, घनश्याम घोलप आदि उपस्थित होते.धनंजय गाडे म्हणाले की, पोलिस मित्र संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. युवकांचे संघटन करुन त्यांच्यामध्ये जागृती निर्माणाचे कार्य केले जात असून, पोलिसांच्या विविध प्रश्नावर संघटनेचे कार्य चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
