जाडकर यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञान पुरस्कार
अहमदनगर, दि. 29 - केडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल जाडकर यांना नगर तालुका आ.भा. मराठा महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त नुकतेच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा सप्ताह कार्यक्रमात जाडकर यांना नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, निवृत्त ले. कर्नल (नौसेना) सदाशिव भोळकर, विद्या तन्वर, अॅड.भानुदास होले, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सचिव मंदा डोंगरे, अॅड.महेश शिंदे आदि उपस्थित होते. जाडकर यांनी अपंगांसाठी केलेले उल्लेखनीय कार्य व ग्रामस्वच्छता अभियानात उत्सफुर्त सहभाग घेतल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. जाडकर जलसंधारण विभागामध्ये कार्यरत असून, मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे जलसंधारण कार्यालय व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
