Breaking News

आत्मविश्‍वास नसलेली माणसे जेंव्हा उसळी मारून पुढे जातात..तेंव्हा इतिहास घडतो

अहमदनगर, दि. 29 - पारितोषिक प्राप्त केलेली माणसे तर जिवनात पुढे जातातच परंतु आत्मविश्‍वास नसलेली माणसे जेव्हा उसळी मारून पुढे जातात. तेव्हा  इतिहास घडवुण आणतात असे प्रतिपादन जेष्ठ अभिनेते किशोर कदम यांनी केले. न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये आयोजीत वार्षिक पारितोषिक  वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाच्या वतीने न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन  करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी व अभिनेते किशोर कदम, अध्यक्ष माधवराव मुळे, उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी.डी  खानदेशे, सहसचिव अ‍ॅड. दिपलक्ष्मी म्हसे, रामचंद्र दरे, श्रीमती.अरूणा काळे, डॉ.संध्या जाधव, डॉ.बी.एच.झावरे, उपप्राचार्य. आर. जी. कोल्हे, डॉ. एम. व्ही. गिते,  डॉ. एस. एस. जाधव, बी. के. साबळे, आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य.डॉ.बी.एच.झावरे म्हणाले की, महाविदयालयाने अर्धशतक पुर्तीकडे वाटचाल केली आहे. अर्धशतक पुर्ण करत असताना आपल्या सर्वांची  जबाबदारी आहे की अर्धशतक पुर्ण केलेले महाविदयालय वास्तवात आले की नाही भारत स्वतंंत्र होवुण इतकी वर्ष पुर्ण झाली असली तरी महाविदयालयात मूल्य  शिक्षणाचे धडे दयावे लागतात. हे शिक्षणाचे यश की अपयश हे ठरवावे लागेल असे ते या प्रसंगी बोलताना म्हणाले. विदयार्थ्यांनी शैक्षणिक कामांसोबत सामाजिक  मुल्ये बाळगुण  विविध उपक्रमांत सहभाग घ्यायला हवा पदवी च्या शिक्षणाबरोबर एखादे कौशल्य विदयार्थ्यांने स्वत:मध्ये विकसित करायला हवे असे आवहान  त्यांनी विदयार्थ्यांना केले. किशोर कदम उर्फ सौमित्र विदयाथ्यार्ंशी संवाद साधताना असे म्हणाले की पारितोषिक प्राप्त केलेले विदयार्थी जिवनात पुढे जातातच  परंतु आत्मविश्‍वास नसलेली माणसे जेव्हा उसळी मारून पुढे जातात तेव्हा इतिहास घडतो.