कोहली ,श्रीजेश, साक्षी मलिक दीपा कर्माकर यांना पद्मश्री
नवी दिल्ली, दि. 25 - यंदाच्या पद्मश्री पुरस्कारांमध्ये खेळाडूंनी बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. हॉकीपटू पी. आर. श्रीजेश, थाळीफेकपटू विकास गौडा, क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला यांच्यासह 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिक, जिमनॅस्ट दीपा कर्माकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच पत्रकार भावना सोमय्या व शेफ संजीव कपूर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौंडवाल, गायक कैलास खेर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला असून आहे.
