Breaking News

घरफोड्या करणारा चिखलीतील चोर पिंपरी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे, दि. 25 - पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोड्या करणार्‍या चिखलीतील एकाला पोलिसांनी मोशी येथून  अटक केली आहे. त्याच्याकडून 8 लाख 23 हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
विक्रम विठ्ठलसिंह ठाकूर (वय 27 रा. कृष्णनगर, प्लॉट क्रमांक 211, निसर्ग हौसिंग सोसायटी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जून निवृत्ती धुमाळ (वय 54 रा. सर्वोदय कॉम्लेक्स, मोरया सोसायटी, सी विंग, फ्लॅट क्रमांक 45, काळाभोरनगर, चिंचवड)  यांच्या घरी 10 जानेवारी रोजी अज्ञाताने चोरी केली. सदनिकेचे कुलूप तोडून 2 लाख 60 हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद त्यांनी पिंपरी पोलिसांत दिली  होती. त्यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांना खबर्‍यामार्फत विठ्ठल ठाकूर नामक व्यक्तीने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्याच्या आधारे आरोपीचा  शोध घेऊन त्याला मोशी टोलनाका येथे ताब्यात घेतले. तपासात त्याने पिंपरी परिसरात पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 29 तोळे सोन्याचे  दागीने, एक एचटीसी कंपनीचा मोबाईल व एक टॅब असे एकूण 8 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे  उघडकीस येण्याची शक्यता आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.