गोड बोलणे हा माणुसकीचा धर्म
। नगरसेविका सारिका भुतकर यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 31 - हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातुन समाज बाधंव एकत्रीत येवुन तिळगुळ समारंभ साजरा करतात या कार्यक्रमामुळे समाजात एकता निर्माण होते. तसेच परस्परांमध्ये समन्वय साधला जातो. प्रत्येकाने एकमेकाशी बोलताना दोन शब्द गोड बोलावे. त्यामुळे समोरील व्यक्तीही दोन शब्द गोड बोलते. यामुळे चार चांगले शब्द तयार होतात. तसेच परस्परामधील संबंध दृढ होतात. गोड बोलणे हा माणुसकीचा धर्म आहे. म्हणुन या सारख्या कार्यक्रमांची गरज असते, असे प्रतिपादन नगरसेविका सारिका भुतकर यांनी केले.प्रभाग क्र.13 च्या नगरसेविका सौ.सारिका भुतकर यांच्यावतीने स्नेहमेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, नगरसेविका सुनिता भिंगारदिवे, छाया तिवारी, सुनिता मुदगल, उषा नलावडे, सुवर्णा जाधव, विणा बोज्जा, निता घुले, पुष्पा बोरुडे, लांडे, कार्तिकी वाळूंजकर, अर्चना शिरसाठ, कविता सौदागर आदिंसह प्रभागातील असंख्य महिला उपस्थित होत्या.