Breaking News

दुचाकी सुरक्षा जनजागृती रॅलीत महिला पोलीस मित्रांचा उस्फूर्त सहभाग

पुणे, दि. 16 - पुणे वाहतुक पोलीस व पुणे शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर येथे दुचाकी सुरक्षा नियमन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात  आले होते. प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या शहर पोलीस मित्रांचा उस्फूर्तपणे सहभाग लाभला. यावेळी रॅली मध्ये उपस्थित असणार्‍या पोलीस मित्रांचे अभिनंदन  पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले. 
यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील सुरक्षा समितीचे पोलीस मित्र उपस्थित होते. तसेच कोथरूड विभागातील महिला पोलीस मित्र उपस्थित होत्या. या अभियानात  उपस्थित राहणार्‍या व सहभाग घेणार्‍या 40 स्वयंसेवकांचा आयुक्तांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केले व त्यांचे अभिनंदनही केले.
महिलांच्या या सहभागाबद्दल विशेष कौतुक केले. परिमंडळ 3 चे उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय  पळसुले व पोलीस निरीक्षक(वाहतूक)बी मुदिराज, विठ्ठल कुबडे, समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी रॅलीस सहकार्य व मार्गदर्शन केले.
रस्ता सुरक्षा अभियानात हेल्मेट वापरण्याकरीता प्रबोधन करण्यात आले व त्याचे महत्व विषद करण्यात आले. महिला पोलीस मित्र सुनीता भगत, सुरेखा काळभोर,  स्मिता कुंबरे, रश्मी कोंढरे, स्वाती बांगर,  गौरी कुंबरे, अश्‍विनी सुर्वे यांचे आयुक्तांनी अभिनंदन केले.
 संदिप कुंबरे, प्रदीप पिलाणे, उमेश कानगुडे, संदीप जाधव, संजय मालुसरे, गणेश वाशिवले, सुरेंद्र आगरवाल, हेमंत यादव, अमित खन्ना, खंडू थोरात, श्याम  चोरघे, निवृत्ति सपकाळ, जयप्रकाश शिंदे, जयेन्द्र मकवाना आणि रवि भावके या सर्वांचे सह-आयुक्त रामानंद यांनी सन्मानित केले. व त्यांना प्रमाणपत्र, टोपी  आणि सॅकचे त्यांना वाटप केले.