Breaking News

तुर केंद्र सुरु करा ः शेतकर्‍यांचे आंदोलन

अहमदनगर, दि. 19 - पाथर्डी कृषि उत्पन बाजार समिती मार्फत शासकीय तूर खरेदी केंद तत्काळ चालू करण्यात यावे या मागणीसाठी तालुक्यातील विविध  संघटनांनी बुधवारी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकर्‍यांसह  आमरण उपोषण सुरु केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी बाजार समितीमध्ये सुरु असलेले तुरीचे  लिलाव बंद पाडले.
नगदी पिका सोबत भुसार मालाचा हमी भाव शासनाने ठरवुन दिलेला आहे. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना आपल्या मालाला हमीभावाने रक्कम मिळावी या  अपेक्षेने शेतकर्‍यांनी यंदा तुर पिकाचे उत्पन्न मोठया प्रमाणात घेतले आहे मात्र पाथर्डी बाजार समितीमधील तुरीसाठी व्यापार्‍यांकाडून 3500 ते 4000 रुपये प्रती  क़्विन्टल लिलावाप्रमाणे तूर खरेदी केली जात आहे. याबाबत यापूर्वी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे हमिभावाप्रमाणे तूर खरेदी करण्यात यावी यासाठी प्रस्ताव पाठविला परंतु  लवकरच हमिभावाप्रमाणे तूर खरेदी सुरु होईल असे आश्‍वासने देऊन शेतकर्‍यांची दिशाभूल केली. बाजार समितीवर ढाकणे गटाची सत्ता आहे. तर राजळे गट  विरोधात आहे. मात्र एकमेकावर कुरघोड्यांचे राजकारण करत दोन्ही गट शेतकर्‍यांची गंमत पाहत आहेत. त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात शेतकरी मात्र भरडला  जात आहे असे  निवेदन आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड, नबाब शेख, सुनील पाखरे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे रामकिसन शिरसाठ, बालम शेख, संदीप  भडके, एकनाथ घुगे, अनिल पालवे यांनी तहसिलदार जयसिंग भैसडे यांना दिले आहे. यावेळी अनेक शेतकर्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
परिसरातील बहुसंख्य शेतकरी यांनी बाजार समितीच्या गेटवर तुरीच्या ढिगावर बसून उपोषण केले यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पाथर्डी यांच्या वतीने  शासकीय हमिभावाप्रमाणे तूर खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी चर्चा झाल्या नंतर लवकरात लवकर 5050 रुपये प्रती क़्विन्टल  लिलावाप्रमाणे बाजार समितीमध्ये तूर खरेदी सुरु करण्याबाबतचे पत्र आंदोलन कर्त्यांना दिल्यामुळे आंदोलन मागे घेतले आहे.