युवा पिढीवर चांगले संस्कार होणे गरजेचे ः हभप संतोष महाराज गिते
अहमदनगर, दि. 19 - संतांनी सर्वांना आदर्श शिकवण दिली आहे. आपली संस्कृती जपण्याचे कार्य केले आहे, या संत मंडळींचा आदर्श घेऊन त्यांचे कार्य आपल्या येणार्या पिढीला कळावे, या हेतूने आज अनेक साधू-संतांनी धार्मिक कार्याला वाहून घेतले आहे. संत मंडळी नेहमी समाजप्रबोधन करुन सर्व धर्म समभावाची शिकवण देत असतात. सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी बालवयातच त्यांच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. त्यांच्यावर धार्मिक, आध्यात्मिक संस्कार होणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादन हभप संतोष महाराज गिते यांनी केले.
सारसनगर येथे संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताहामध्ये किर्तन करताना हभप संतोष महाराज गिते (भगवान गड) बोलत होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन घुले, उपाध्यक्ष भगवान आव्हाड, झुंबरराव आव्हाड आदि उपस्थित होते.
परमेश्वराच्या चिंतनाने जो आनंद मिळतो, तो दुसरा कशातही नाही. माणसाच्या अंगी स्वस्थ्यता असावी, हळवेपणा नसावा. संसारीक जीवनात माणसाने स्थिर व्हावे. संतांच्या अंगी स्नेह व प्रेमभाव असतो. दुसर्याला सांगण्यापेक्षा सुरुवात स्वत:पासून करा. मनुष्यजीवन हे नेहमी सदाचारी असावे. कोण कोण काय करतो, यापेक्षा आपण काय करतो हे पहावे. मनुष्य जीवन हे नेहमी दुसर्यांच्या चुका शोधण्यातच आपला वेळ वाया घालतो, तसे न करता स्वत:त बदल करुन हा वेळ ईश्वर ध्यानात घालावा, त्यातून आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये जे काही सद्कार्य करत राह त्यामध्येच परामार्थ आहे. ज्या ठिकाणी भक्तीमय वातावरण असते. तेथील माणसे परमेश्वर रुपी असतात, असे विविध दाखले देत हभप संतोष महाराज गिते यांनी भाविकांना उपदेश केला.
यावेळी त्यांनी गायनाचार्य टाळकरी, सप्ताहाचे आयोजक यांचे विशेष कौतुक केले. सप्ताह यशस्वीतेसाठी निलेश बडे, अनिल पालवे, अमोल खाडे, भैरु सानप, भगवान आव्हाड, चैतन्य घुले, दिलीप घुले, भगवान ढाकणे, चेमटे महाराज, देवराम घुले, महादेव भाबड, गणेश भाबड, प्रदीप घोडके आदिंसह उत्सव समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे.