उमेदवारांवरील गुन्ह्यांची माहिती फ्लेक्सवर झळकणार : मुद्गल
सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) : उमेदवारांनी अर्ज भरताना आर्थिक, शैक्षणिक, गुन्हेगारीची परिस्थिती त्यात नमूद केलेली असते. मात्र ती कागदारवर राहत असल्याने मतदारांना समजत नव्हती, परंतू आता निवडणूक आयोगाने ती माहिती प्रत्येक मतदान केंद्रावर लावण्याच्या सूचना प्रथमच जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत, तशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्गल यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.
मद्गल म्हणाले दुसर्या टप्प्यात होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी 1 ते 6 फेब्रुवारीदरम्यान अर्ज दाखल केले जातील.
त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्याची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार असून, तालुकास्तरावर अर्ज दाखल करुन घेतले जातील. 5 फेब्रुवारीला सार्वजनिक सुटीदिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 7 रोजी छाननी होईल. 10 फेब्रुवारीपासून जिल्हा न्यायाधीशांकडे अपिल करता येईल. 13 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यास मुदत राहील. अपिल केले असल्यास ही मुदत एकपर्यंत राहील. 21 ला मतदान व 23 ला सकाळी 10 वाजता मतमोजणी होईल.
बँकांकडून संशयास्पद खात्याची, त्यातील व्यवहाराची माहिती सादर केली जाणार आहे. तर प्राप्तिकर विभागाची करडी नजर राहील. उमेदवारी दाखल केल्यानंतर आजचा खर्च उद्याच्या दुपारी दोन वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक असून, कॅशलेस, धनादेशाद्वारे व्यवहार करावे लागतील. बँकांमध्ये उमेदवारांनी स्वतंत्र खाते तयार करुन तसे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर एकूण 2500 मतदार केंद्रातून संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रे तपासली जातील.