कदम यांच्याकडून जॉगिंग ट्रॅकची पाहणी
अहमदनगर, दि. 23 - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छता अभियान एक कदम की स्वच्छता की ओर अंतर्गत संपूर्ण नगर शहरात स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले. या अंतर्गत महापौर सुरेखा कदम व जिल्हा स्वच्छतादूत शारदा होशिंग यांनी नगर शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.स्वच्छता अभियान अंतर्गत जॉॅगिंग ट्रॅकची महापौर सुरेखा कदम यांनी पाहणी करून स्वतः हातात खराटा घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. याप्रसंगी प्रभाग 11चे नगरसेवक योगीराज गाडे उपस्थित होते. यावेळी महापौर सुरेखा कदम यांनी पाणी व कचरा याविषयी नागरिकांसमवेत चर्चा केली. यावेळी प्रभागातील सुप्रभात ग्रुपचे अविनाश मुंडके, उदय मिस्किन, राजू मंगलारप, महेश लांडगे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
