Breaking News

मनसेला सोडून जाणार्‍यांचे राजकारण भविष्यकाळात संपलेले असेल

अहमदनगर, दि. 23 - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने समाजामध्ये चांगले काम केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्‍नांवर आंदोलने करून विद्यार्थ्यांना  न्याय मिळवून दिला आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांचे संघटन करून समाजातील तळागाळातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पक्षाचे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 10 वर्षांत राज्य सरकारला अनेक समाजोपयोगी निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यांनी नाशिकचा गेल्या 5 वर्षांत विकास करून  दाखवला आहे. मनसेला सोडून जाणार्‍यांचा भविष्यकाळात राजकारण संपलेले असेल, असे प्रतिपादन मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केले.
मनसे विद्यार्थी सेनेत आकाश साबळे, विवेक मोरे, ऋषिकेश ढवळे, अमोल नगरे, धनराज भिंगारदिवे, विशाल चव्हाण, वैभव वाघमारे, वैभव कदम, वैभव साबळे,  सागर गिते, सोनू दराडे, प्रशांत कांबळे, सौरभ ढवळे, अनिकेत शेंडगे, आकाश शेंडगे यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचे श्री. डफळ यांनी स्वागत केले. यावेळी ते बोलत  होते. यााप्रसंगी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, गिरीश जाधव, शहराध्यक्ष परेश पुरोहित, जिल्हा सचिव अभिषेक मोरे, अनिकेत सियाळ, महेश शेळके,  प्रमोद जाधव, शरद सोनवणे, विजय कुसळकर, प्रवीण आढाव, मनीष मेढे आदी उपस्थित होते.
विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा म्हणाले की, नगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम मनसेने केले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  फी संदर्भात, तसेच प्रवेशासंदर्भात आवाज उठवल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचा फायदा झाला.