कामाचे तास कमी करुन मुंबई पोलिसांना नववर्ष भेट
मुंबई पोलिसांच्या नियंत्रणातील काही कक्ष बंद करण्यात येणार आहेत. यामध्ये वाहनचोरी विरोधी कक्ष, सीआययू विभागाचे लॉजिस्टीक युनीट, मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी कक्ष, सोनसाखळी चोरी विरोधी कक्ष या कक्षांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांना अनेक वेळा जास्तीचे काम करावे लागते. तसेच अनेकदा बंदोबस्तासाठी त्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या जातात. या पार्श्वभूमीवर देवनार पोलीस ठाण्यातील एका शिपायाकडून पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेत पडसलगीकर यांनी हा निर्णय घेतला आहे.