एसबीआय कडून नवीन वर्षाचं गिफ्ट, व्याजदरात मोठी कपात
मुंबई, दि. 01 - देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरात 0.90 टक्क्यांनी कपात केली आहे. 1 जानेवारी 2017 पासून म्हणजेच आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती एसबीआयने दिली आहे.
फंड आधारित कर्जावर 8.90 टक्क्यांवरुन 8 टक्के एवढी कपात करण्यात आली आहे, असं एसबीआयने जारी केलेल्या अधिसुचनेत म्हटलं आहे. शिवाय जानेवारी 2015 पासून आतापर्यंत व्याजदरात दोन टक्क्यांनी कपात केली असल्याचंही बँकेने म्हटलं आहे.
स्टेट बँक ऑफ त्रावणकोरनेही गेल्या आठवड्यात व्याजदरात 0.30 टक्क्यांनी कपात केली होती. तर आयडीबीआयनेही वेगवेगळ्या प्रकारच्य व्याजावर 0.60 टक्के कपात केली आहे. नोटाबंदीनंतर बँकात मोठ्य प्रमाणात रक्कम जमा झाल्यामुळे बँकांनी हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.रिझर्व बँकांच्या आकडेवारीनुसार 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर 10 डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये 12.4 लाख कोटी रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणामध्ये नोटाबंदीने व्याजदर कमी होतील, असा अंदाज वर्तवला होता.