Breaking News

जर्मनीच्या राज्यप्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 27 - जर्मनीच्या बाडेन वुरत्तेम्बर्ग (दक्षिण पश्‍चिम जर्मनी) या राज्याचे प्रमुख  विन्फ्रेड क्रेश्मान यांनी गुरुवारी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. 
यावेळी महाराष्ट्र तसेच बाडेन वुरत्तेम्बर्ग या राज्यांमध्ये शैक्षणिक, व्यापारी तसेच सांस्कृतिक संबंध वाढविण्यावर चर्चा झाली.भेटीनंतर शिष्टमंडळाने राज्यपालांनी  प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या चहापानाला देखील उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक उपस्थित होते.