नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला!
पुणे, दि. 03 - नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा हटवण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे. राम गणेश गडकरींच्या महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. यातील मजकूर खटकल्याने संभाजी ब्रिगेडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास पुतळा हटवला आणि शेजारुन वाहणार्या मुठा नदीत पुतळा फेकून दिला.
पुण्यातील जंगली महाराज रोडवर महापालिकेचं संभाजी उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता. 23 जानेवारी 1962 मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते संभाजी उद्यात राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.