Breaking News

भाजी बाजार उपक्रमातुन विद्यार्थ्यांना व्यवसाईक ज्ञान ः काळे

अहमदनगर, दि. 20 - भाजी बाजार उपक्रमातून विदयार्थ्यांना व्यावसाईक ज्ञान मिळते. व अभ्यासाची गोडी वाढते. त्यामुळे सर्व शाळातून उपक्रम राबविले  जावेत. अशी प्रतिक्रिया जामखेड पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी पोपटराव  काळे यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्‍वर जामखेड येथे दि. 19 जानेवारी रोजी मुलांना व्यवहारीक ज्ञान प्राप्त व्हावे. या दृष्टीकोणातून शाळेत भाजी बाजाराचे  अयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी पोपट काळे,  गट विकास अधिकारी अतूल पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील,  सारोळा गावचे सरपंच अजय काशीद, नगरसेवक पवन राळेभात, दिगांबर चव्हाण ,शामीर सय्यद, मनोज भोरे, मुकुंद सातपूते, शैलेंद्र मोरे, शिवसेना शहरप्रमुख  संजय काशीद,  मुख्याध्यापक सय्यद शहेणाज आदीसह परिसरातील पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
भाजी बाजार उपक्रमामध्ये भाजी पाला,फळे,खाऊचे प्रदार्थ असे विविध स्टॉल लावण्यात आले होते. हा पहिलाच बाजार असल्याने परिसरातील नागरिकांचा  उर्स्फुत प्रतिसाद मिळाला. या उपक्रमा बरोबरच मकरसंक्रातीच्या सनानिमित्त महिलासांठी हळदीकुंकचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी  इंग्लिश माध्यमाच्य शाळेतून आलेला विदयार्थी मल्हारी सोनवणे याला इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात आला.व इयत्ता पहिलेचे प्रवेश सुरू करण्यात आले.यावेळी  गट शिक्षणाधिकारी पोपट काळे यांच्याहस्ते गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. तपनेश्‍वर शाळेत वर्षभर विविध उपक्रम वेगवेगळया माध्यमातून राबविले  जातात. या सर्व उपक्रमात समाजातील प्रत्येक घटकाला समावून घेतले जाते. या बदद्ल गटशिक्षणाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  नारायण राऊत  तर  संजय आरेकर यांनी आभार मानले.